
हिंदु नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. आज गुढीपाडव्याला नववर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. “गुढीपाडवा’ निमित्त विश्व हिंदु परिषद परिवार भंडाराच्या वतीने खांबतलाव परिसरात येथे ५१ फुट धर्मध्वजेचे रोहण करण्यात आले. शहरातील गांधी चौक, विहिंदू परिषद जिल्हा कार्यालय, शास्त्री चौक, राजीव गांधी चौक, किसान चौक, श्रीराम मंदिर मेन रोड भंडारा येथे गुढी रोहण करण्यात आले. सकाळी शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. गांधी चौक भंडारा येथे भृशुंड ढोल ताशा पथक वादन व “मराठी पाऊल पडते पुढे’ ही सांस्कृतिक नाट्य सादर केली. यावेळी विश्व हिंदू परिषद, श्रीराम शोभायात्रा समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हिंदू समाजबांधव उपस्थित होते.
-चित्रसेवानितीन कुथे, भंडारा