जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पदकप्राप्त खेळाडूंचा सत्कार
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सुखना लेक, चंदीगड येथे ११ ते १७ मार्च २०२५ दरम्यान झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॅनोइंग, कायाकिंग आणि ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेत भंडारा जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. महिला संघाने ड्रॅगन बोट प्रकारात दोन रजत, एक कांस्य पदक आणि घ२ ५०० मीटर प्रकारात एक कांस्य पदक जिंकत चमकदार कामगिरी केली. तसेच ड्रॅगन बोट महिला संघाने सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवले. त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, क्रीडा अधिकारी आकाश गायकवाड, तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक अविनाश निंबार्ते (राज्य क्रीडा मार्गदर्शक) उपस्थित होते. सन्मानित खेळाडू वैष्णवी आजबले, मोना बडवाईक, लीना नागलवाडे, श्रद्धा साठवणे, प्रणाली तरारे, आयुषा खोब्रागडे, ॠतू लांडगे, रुचिका हटवार, ॠषिका जमजारे, हर्षिता उके, शुभांगी सार्वे, अपेक्षा गजभिये, सायली टेंभुर्णे, रुपाली टांगले, आकांक्षा वैद्य या खेळाडूंच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.