भंडारा, गोंदियातील ४ हजार ४०० माजी मालगुजरी तलाव होणार गाळमुक्त

याची दखल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेत संबंधित विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले. त्याचबरोबर याविषयी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सचिवांसह इतर अधिकाऱ्यांची बैठक बोलवून हे तलाव गाळमुक्त करण्याचे आदेश दिले. तसेच, याकामी सरकारसह टाटा, नाम फाऊंडेशन गाळउपसण्याचे कार्य करणार आहेत. यामुळे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.