पोलीस मुख्यालयात जातीय सलोखा/ शांतता कमिटीची बैठक संपन्न
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- बहुउद्देशीय हॉल, पोलीस मुख्यालय, भंडारा येथे हनुमान जन्मोत्सव, इस्टर डे, गुड फ्रायडे, रमजान, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जातीय सलोखा शांतता कमिटी पार पडली. यावेळी, पोलीस अधीक्षक नूरुल हसन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे, पोलीस उपअधीक्षक कुलकर्णी, पोलीस निरीक्षक गोकुल सुर्यवंशी यांचे सोबत राहुल डोंगरे, परवेज पटेल, तौसीफ खान, नदीम खान, मनिष बिझवे, प्रकाश पांडे, थानथराटे, व इतर मान्यवर उपस्थित होते. मा. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी सांगितले की, भंडारा जिल्हा हा शांतता प्रिय जिल्हा असून लोक प्रशासनाला सहकार्य असते. पदभार स्वीकारले पासून अवैध रेती, अवैध गुटखा, अवैध दारू अशा अनेक अवैध धंद्यावर फार मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या आहेत.
सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. समाजात शांतता ठेवल्याने आपल्या जिल्ह्यात विविध उद्योग येऊन आपल्या राज्याचा, देशाचा विकास होणार आहे. समाजातील सर्व दुर्बल घटकांच्या पाठीशी आम्ही उभे असून कायद्याचे पालन सर्वांनी करायच आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा डायल ११२ ला कॉल करून माहिती देण्याचे आवाहन केले. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी सांगितले की, जिल्ह्याची ओळख ही सदभावना, जातीय सलोखा, नागिरकांचे प्रशासनास सहकार्य यावर अवलंबू न असते. प्रत्येक धर्माच्या सणाचा आदर सर्वांनी करावा. सर्वानी विधायक उपक्रम करून समाजभिमुख सण साजरे करावेत. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.