गडचिरोली १००% नक्षलमुक्त ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजन अन् स्टील हबपर्यंत…; मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधानापुढे विकासाचा रोडमॅप सांगितला

गेल्या कित्येक वर्षापासून आमचा गडचिरोली जिल्हा नक्षलवादाशी झुंजतो आहे, तोच दुर्गम जिल्हा १५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नक्षलमुक्त झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

दै. लोकजन वृत्तसेवा

गडचिरोली :- जनजातीय आणि आदिवासी समाजाचा एक उज्ज्वल इतिहास आहे, समृद्ध अशी संस्कृती आहे. जेव्हा-जेव्हा या देशावर आक्रमण झालं त्यावेळी त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्यांमध्ये आमचे आदिवासी नायक अग्रस्थानी राहिलेले आहे. पण हे सर्व आदिवासी नायक विस्मृतीत गेले, त्यांचा इतिहास दाबण्यात आला, त्यांचं योगदान लपवण्यात आलं. मात्र जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले तेव्हा त्यांच्या नेतृत्वात या सर्व आदिवासी सेनानाकांच्या कर्तृत्वाला आनि पराक्रमाला समाजापुढे आणण्याचा निश्चय त्यांनी केला. आज इतिहास पुन्हा आमच्या नायकांच्या स्मृतींना उजाळा देत आहे. या सेनानाकांचे चरित्र, पराक्रम सर्वांपुढे आणण्याचे काम पंतप्रधान मोदीजी करत आहे, असे वक्तव्य রাজ্যের मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा देशस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. गडचिरोली राज्याचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा म्हणून नावारुपास येईल. गेल्या कित्येक वर्षापासून आमचा गडचिरोली जिल्हा नक्षलवादाशी झुंजतो आहे, तोच दुर्गम गडचिरोली जिल्हा १५ नोव्हेंबरस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात १००% नक्षलमुक्त झाला आहे. शिवाय हा जिल्हा केवळ माओवाद मुक्त नव्हे, तर देशाच्या विकासाचे इंजन बनण्यासाठी सज्ज आहे. देशाची स्टील सिटी म्हणून पंतप्रधानांच्या नेतृत्वात आम्ही त्याला विकसित करत आहोत. मात्र, या सर्वात आदिवासी, दलित ओबीसी, यांना आम्ही केंद्रस्थानी मानलं आहे. परिवर्तन काय असतं, हे आज गडचिरोली अनुभवतंय. गडचिरोली राज्याचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा म्हणून नावारुपास येईल. असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांच्या नेतृत्वात सुवर्ण इतिहासाला, आमच्या नायकांच्या स्मृतींना उजाळा

आमच्या महाराष्ट्रात मग टंट्या मामा भिल्ल असो, किंवा राघोजी भांगरे असो, या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आणि दुर्गावती यांच्या सारख्या कित्येकांचे योगदान विस्मृतीत गेलं होतं. पण पंतप्रधानांच्या नेतृत्वात या सुवर्ण इतिहासाला सर्वांपुढे नव्याने आणण्याचे काम केलं जात आहे. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की, इंग्रज, सावकारांनी तत्कालीन काळात आमच्या आदिवासींकडून जल, जंगल, जमीन हिसकावण्याचा प्रयत्न केला. अनेक अत्याचार त्यावेळी झालेत त्यावेळी अवघ्या १५ वर्षांच्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांनी लढा देत मोठं आंदोलन उभं केलं. जल, जंगल, जमीनसह आदिवासीची संस्कृती, परंपरा आणि सन्मान जपला. इंग्रज तर म्हणत होते की बिरसा मुंडा एक नव्हे ते अनेक आहेत. आज त्यांना वंदन करतांना अभिमानाने उर भरून येतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकेकाळी नक्षलवादामुळे देशाच्या नकाशावर, आता देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा ऐतिहासिक सोहळा क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा देशस्तरीय कार्यक्रम १४ नोव्हेंबर रोजी पार पडता आहे. गडचिरोलीतील क्रीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला आहे.

एकेकाळी नक्षलवादामुळे देशाच्या नकाशावर संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीला आज देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडतोय. आदिवासींच्या शौर्वाचा, त्यागाचा आणि समृद्ध संस्कृतीचा गौरव करण्यासाठी यंदा गडचिरोलीला देशस्तरीय यजमानपद मिळालं आणि याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ या राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ १४ नोव्हेंबर रोजी करण्यात आलाय. दरम्यान १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा मुख्य सोहळा गडचिरोलीत पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे या सोहळ्याला मार्गदर्शन करणार असून, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती नियोजित आहे.

१००% नक्षलमुक्त गडचिरोली ते देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजन अन्न स्टील हबपर्यंत… मुख्यमंत्री काय-काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील २०१४ साली महाराष्ट्र पहिलं राज्य जिथे पेशाचा कायदा लागू केला आणि ११ वेगवेगळ्या जागांवर आदिवासींसाठी आरक्षण मिळवून दिलं. धरती आबा योजना, हॉस्टेल स्वयम् सारख्या योजनेतून ६० हजार रुपये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी देत शिक्षणाच्या सोयी मिळवून दिल्या. आदिवासी विद्यार्थी आज विदेशात शिक्षण घेत आहेत. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *