आमची ३६ कुळांची प्राचीन ओळख पुसण्याचे षडयंत्र कधीही यशस्वी होणार नाही! – मयूर बिसेन

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- दि. १४ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय क्षत्रिय पंवार पोवार महासंघ भारताची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पोवार सांस्कृतिक सभागृह, गोंदिया येथे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मुन्नालाल रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

क्षत्रिय पंवार (पोवार) समाजाची ३६ कुळांची प्राचीन ओळख, गौरवशाली इतिहास आणि स्वतंत्र सामाजिक अस्तित्व नाकारण्याचा अथवा ते मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या बैठकतून स्पष्ट संदेश देण्यात आला की, कोणत्याही समाजाची ऐतिहासिक ओळख एखाद्या व्यक्तीच्या स्वार्थासाठी, राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी किंवा वैयक्तिक लाभासाठी संपविता येणार नाही. अखिल भारतीय क्षत्रिय पंवार पोवार महासंघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मयूर बिसेन यांनी सांगितले की, आपल्या ३६ कुळांचा इतिहास हा केवळ भूतकाळातील कहाणी नसून ती आपली परंपरा, अस्मिता, स्वाभिमान आणि सामाजिक गौरवाचे प्रतीक आहे.

ते पुढे म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी किंवा खाजगी फायद्यासाठी समाजाच्या ऐतिहासिक ओळखेशी खेळण्याचा अधिकार नाही. समाजाच्या इतिहासात आपल्या सोयीनुसार बदल करणे, मनमानी आणि काल्पनिक तथ्यांच्या आधरे नवीन व्याख्या मांडणे तसेच त्याचे समर्थन करणाऱ्यांनी समाजासमोर आपले तर्क आणि ठोस पुरावे सादर करणे आवश्यक आहे.

मयूर बिसेन पुढे म्हणाले की, समाजाची ऐतिहासिक ओळख पुसण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. जर कोणाला ३६ कुळांच्या परंपरेबाबत अथवा समाजाच्या गौरवशाली इतिहासाबाबत आक्षेप असेल, तर त्यांनी तथ्ये आणि पुराव्यांच्या आधरे आपली भूमिका मांडवाची. केवळ मनमानी दावे आणि वैयक्तिक विचारांच्या आधारावर इतिहास बदलता येत नाही. आता गप्प बसण्याची वेळ नाही, तर सत्य, तथ्ये आणि पुराव्यांच्या आधारे समाजाच्या अस्मितेच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची वेळ आहे. समाजातील सर्व बांधवांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून आपला ऐतिहासिक वारसा, ३६ कुळांची परंपरा आणि सामाजिक स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पद कितीही मोठे असो, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, समाजाच्या इतिहासापेक्षा कोणीही मोठे नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *