३२ कोटींच्या रोकड जप्ती प्रकरणनातील सोनू जैन यांना परदेशवारीची मुभा! मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय; १५ दिवसांसाठी कुटुंबासह व्हिएतनामला जाण्याची परवानगी
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- तब्बल ३२ कोटी रुपयांहून अधिक रोकड, एक किलो सोने आणि २०० किलोपेक्षा अधिक चांदी जप्त झाल्याच्या आर्थिक गुन्हे प्रकरणातील आरोपी अनंत उर्फ सोनू जैन यांना अखेर परदेशवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जैन यांना कुटुंबासह १५ दिवसांसाठी व्हिएतनामला जाण्याची सशर्त परवानगी दिली आहे. न्यायमूर्ति मेहराज के. पठाण यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय देताना नागपूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा विदेश प्रवासास परवानगी नकारणारा आदेश रद्द केला.
या प्रकरणात जैन यांच्या वतीने अधिवक्ता ए.झेड. मिर्ज़ा और एस.पी. सोनवणे यांनी बाजू मांडली. २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला, त्यावेळी जैन दुबई येथे होते. उच्च न्यायालयाकडून अंतरिम संरक्षण मिळाल्यानंतर ते भारतात परतले आणि तपासात सहकार्य केले. अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांना नियमित जामीन मंजूर झाला. तपास पूर्ण होऊन आरोपपत्रही दाखिल करण्यात आले आहे. त्यामुळे विदेश प्रवासाची परवानगी नाकारण्याचे कारण नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
सरकारी पक्षाचा फरार होण्याचा धोका असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. सहायक सरकारी अभियोक्ता घोगरे यांनी या प्रवासाला विरोध केला. प्रकरणात मोठ्या प्रमाणावर रोकड, सोने आणि चांदी जप्त करण्यात आली असून, अद्याप आरोप निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे आरोपी परदेशात जाऊन परत न येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.








