तुमसर शहरातील ५० लाख रुपयांची सीसीसीव्ही यंत्रणा पूर्णतः ठप्प

कंट्रोल रूम असूनही यंत्रणा कागदावरच

सर्वच ४० कैमरे बंद, एनव्हीआर आणि हार्ड डिस्कच गायब

दै. लोकजन वृत्तसेवा

तुमसर :- शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, चोऱ्या-घरफोड्या आणि अपघातांसारख्या घटनांना आळा बसावा, या उद्देशाने नगरपरिषदेमार्फत तब्बल ५० लाख रुपये खर्च करून बसवण्यात आलेली ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा यंत्रणा पूर्णपणे बंद पडली आहे. प्रशासनाच्या अक्षय्य दुर्लक्षामुळे आणि ठेकेदारच्या मनमानी कारभारामुळे ही लाखो रुपयांची यंत्रणा सध्या ‘पांढरा हत्ती’ ठरली असून धूलखात पडली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांकडून सलग तीन स्मरणपत्रे पाठवूनही नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदार मूग गिळून गप्प बसले आहेत.

शहरातील महत्त्वाच्या १२ ठिकाणी एकूण ४० सीसीटीव्ही कैमरे बसवण्यात आले असून, या यंत्रणेचा मुख्य कंट्रोल रूम पोलीस स्टेशन, तुमसर येथे स्थापित करण्यात आला आहे. ‘जेम’ पोर्टलद्वारे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या ‘सोनवणे एंटरप्रायजेस’ या ठेकेदाराने प्रत्येक कॅमेऱ्यामागे तब्बल १ लाख २५ हजार रुपयांचा खर्च दाखवला आहे. मात्र, अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या एका वर्षातच शहरातील सर्वच ४० कैमरे पूर्णपणे बंद पडले आहेत.

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या १२ ठिकाणी कैमरे बसवले आहेत, त्यापैकी एकाही ठिकाणी व्हिडिओ रिकॉर्डिंगसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी (नेटवर्क व्हिडिओ रिकॉर्डर) आणि ‘हार्ड डिस्क’ बसवलेलीच नाही. यामुळे शहरात कोणतीही चोरी, घरफोडी किंवा गंभीर अपघात घडल्यास पोलिसांना तपासासाठी एक सेकंदाचीही फुटेज उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यंत्रणेमधील या गंभीर त्रुटी दूर करून सीसीटीव्ही कैमरे त्वरित सुरू करण्यासाठी पोलीस स्टेशन तुमसरकडून नगरपरिषद प्रशासनाला बारबार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी यापूर्वी दि. १९ जून २०२६, दि. ०१ सप्टेंबर २०२६ आणि त्यानंतर दि. ०३ नोव्हेंबर २०२६ रोजी सलग स्मरणपत्रे पाठवली आहेत. परंतु, नगरपरिषने प्रशासनाने या पत्रána निख्वळ केराची टोपली दाखवली असून, ठेकेदारारवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

शासकीय निधीचा असा सरेआम अपव्यय होत असताना आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असताना नगरपरिषद प्रशासन सुस्त असल्यामुळे याप्रकरणी नुकтеच जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते सलमान पठाण, पराग व्यवहारें, शब्दशील बेलखेडे आदी उपस्थित होते. शासकीय निधीची उधळपट्टी करणाऱ्या ‘सोनवणे एंटरप्रायजेस’ या ठेकेदारार तात्काळ ফৌজदारी कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच दोषी अधिकारी व ठेकेदारावर कठोर कारवाई करत संपूर्ण यंत्रणा तात्काळ पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *