राज्य युथ ॲथलेटिक्स स्पर्धेत जानवी तरोनेचे सुयश
थाळी फेक मध्ये रौप्य तर गोळा फेक मध्ये कांस्य
पंजाबमधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
दै. लोकजन वृत्तसेवा
साकोली :- अठरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य युथ ॲथलेटिक्स मीट २०२६ या स्पर्धा नुकत्याच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील डेरवण या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सर्वांगीण शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंडेपार येथील इत्ता ११ वी ची विद्यार्थिनी व वॉरियर्स स्पोर्ट अकॅडमी साकोली तसेच विजय करिअर अकॅडमी साकोलीची उत्कृष्ट क्रीडा पटू जानवी दिनेश तरोने हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या स्पर्धेत जानवीने थाळी फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदाकावर आपले नाव कोरले. तसेच गोळा फेक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून कान्सय पदक जिंकले. या तिच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे येत्या १ ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पंजाबमधील लुधियाना येथे होवू घातलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या यशाचे श्रेय तिने प्रशिक्षक सुशांत बांडेबुचे, क्रीडा शिक्षक अरुण पवार, बाळकृष्ण दोनोडे यांना दिले आहे. या यशाबद्दल वॉरियर्स स्पोर्ट अकॅडमी साकोली व विजय करिअर अकॅडमी साकोली तसेच सर्वांगीण शिक्षण संस्थेचे सचिव एड. एस. व्ही. हलमारे, सहसचिव रंजना हलमारे, प्राचार्य अमोत हलमारे, सदस्य अमित हलमारे, सुजाता गोमासे तसेच सर्व सर्वांगीण शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंडेपार येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








