ढालसिंग बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल झाल्याबद्दल भंडारा येथे जल्लोष

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- पोवार समाजाचे गौरव ढालसिंग बिसेन यांची उत्तराखंडच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने आज पंवार समाज भवन, विद्यानगर, भंडारा येथे एका हर्षोल्लास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पोवार समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच समाजातील एखादी व्यक्ती राज्यापालसारख्या सर्वोच्च घटनात्मक पदावर पोहोचली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पोवार समाजात आनंदाची लाट पसरली आहे.

कारграммаचे आयोजन अखिल भारतीय क्षत्रिय पंवार पोवार महासंघ, महाराष्ट्रर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष मयूर बिसेन होते. अखिल भारतीय क्षत्रिय पंवार पोवार महासंघ भारताचे संघटन सचिव हिरदीलाल ठाफरे, कार्यकारिणी सदस्य डॉ. हरगोविंद टेंभरे, प्रकाश राहंगडाले, मिताराम बिसेन तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश टेंभरे, पोवार एकता मंचचे उपाध्यक्ष सुनील पटले, भंडारा जिल्हा अध्यक्ष विजय पारधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी समाजाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी बिसेन यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाची आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाची आठवण करून त्यांच्या उज्ज्वल कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

शेवटी सर्वांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला आणि समाजाच्या या गौरवशाली क्षणाला संस्मरणीय बनवले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश पारधी, पन्नालाल राणे, संजय पटले, राजेश चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *