पंधरा दिवसात बोनस मिळाले नाही तर जिल्हाव्यापी आंदोलन करू

दै. लोकजन वृत्तसेवा
साकोली :- पंधरा दिवसात दानाचे बोनस मिळाले नाही तर जिल्हा व्यापी आंदोलन करण्याच इशारा भारतीय किसान संघाने पत्रकार परिषदेतून दिला आहे.

भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत जिल्हा भंडाराच्या वतीने खरीप हंगाम २०२४-२५ चा धान बोनस उर्वरित शेतकऱ्यांना मिळाला नाही ते त्वरित देण्यात यावा आणि खरीप हंगाम २०२५ – २६ च्या बोनस बाबीत आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांना धान बोनस देण्याचे आश्वासन मागील अधिवेशनात देण्यात आले होते. परंतु अद्याप धान उत्पादक शेतकऱ्यांना ध्याचेने हेक्टरी २० हजार रुपये मिळाले नाही तो तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित शेतकऱ्यांना दोन लाख प्रोत्साहन राशी देण्यात यावी.

शेतीपंसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला त्यांना वीज जोडणी द्यावी. जंगली जनावरामुळे होणारे नुकसान यामध्ये माकडामुळे होणारी नुकसान समाविष्ट करावी आणि त्याचा पंचनामा करून ठराविक वेळी भरपाई द्यावी. अस्वल, जंगली दुक्कर, मधमाश्या व अन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांची जीविताची नुकसान हे ग्राह्य धरण्यात यावी व वन कायद्यात समाविष्ट करण्यात यावा. धान व इतर पिकांचे कापणी, बांधणी, मळणी शेतमजुराची सर्व कामे जीरामजी योजनेत समाविष्ट करावी. वैनगंगा नदीवर उपसा सिंचन उभे करून त्यांचा लाभ साकोली तालुक्याला द्यावा. पांदन रस्ते योजनेत ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील पांदन रस्ते लवकरात लवकर दुरुस्ती व अतिक्रमण हटविण्यात यावेत. नगरपरिषद हद्दीत असलेल्या शेत जमिनीला जीरामजी योजनेत पांदन रस्ते तयार करावेत. नगर परिषद क्षेत्रात दरवर्षी आमसभा घेण्यात यावी. व इतर मागण्या आहेत जर मागण्या पूर्ण झाले नाही.

अन्यथा येत्या पंधरा दिवसात जिल्हा व्यापी आंदोलन करू असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हा मंत्री दिनेश कापगते, जिल्हा कोषाध्यक्ष मधुकर कापगते, भास्कर चिरवतकर, वामन कापगते, मुकेश बावणे, सुरेश हरीणखेडे, एकनाथ दोनोंडे, सूर्यभान निर्वाण, गिरीधारी लांजेवार, दीपक कापगते, सतीश मानकर, इंद्राणी कापगते, माया टेंभुर्णे, रजनी करंजेकर, ईश्वर नागपुरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *