चिमुकलीवरील अट्याचाराच्या नराधमाला फाशी द्या; शिवसेना (उबाठा) ची मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भंडारा शहरातील आंबेडकर वार्डातील अंगणवाडीतील साडे तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी रोहित वासनिक याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारच्या सुमारास आंबेडकर वार्डात ही संतापजनक घटना घडली. आरोपीवर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत असून तो व्यसनाधीन असल्याची चर्चा आहे. या घटनेने शहरात तीव्र संताप होत आहे.
जिल्ह्यात विशेषतः शहरी भागात गांजा, एम.डी. सारख्या अंमली पदार्थांचे सेवन वाढле असून उघडऱ्यावर दारू पिण्याच्या प्रकारांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी व जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री व सेवनावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेडन देतेवेळी जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, शहर प्रमुख राकेश आग्र्रे, शहर संघटक मयूर जोशी, प्रकाश गभणे, चित्रगंध सेलोकर, राजेश ठवकर, नितेश गभणे, संतोष चांदेवार, अनिरुद्ध गाढवे, शामराव मालखंडाळे, योगेश पवनकर, गोलू कांबळे, मोनू हेडाऊ आदी शिवसैनिक उपस्थित होते.








