जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यतेत रेड क्रॉस भंडाराची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

अहवालाचे विमोचन, सदस्यता – आपदा मित्र प्रमाणपत्र, पल्स ऑक्सिमीटरचे व ओळखपत्राचे वितरण, महिलांचा सन्मान

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, भंडाराची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सावन कुमार यांच्या अध्यतेत उत्साहात पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, चेअरमन डॉ. अशोकराव ब्राह्मणकर, मानद सचिव डॉ. नितीन तुरसकर, डॉ. विशाखा गुसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेत सन २०२२ ते २०२५ पर्यंतचा वार्षिक ताळेबंद व आढावा सादर करण्यात आला. उपस्थित सदस्यांनी सर्वानुमते ठराव मंजूर केले. आगामी जिल्हा कार्यकारिणीची यादी अध्यक्षांच्या अंतिम अनुमतीसाठी पाठविण्याचे ठरले.

अध्यक्ष जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते वार्षिक अहवालाचे विमोचन करण्यात आले. तसेच रेड क्रॉसच्या आजीवन सदस्यत्व प्रमाणपत्र, आपदा मित्र प्रमाणपत्र, पल्स ऑक्सिमीटर, ओळखपात्राचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व पुरुष सदस्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. जेन हेरी डचुनॉन्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमेव नॉमिनेशन मिळालेले प्रीतमकुमार राजाभोज, आसगाव पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उत्कृष्टरित्या काम करणारे जेरूह नागरिक सेवकराम शाहू यांची सत्कार करण्यात आला.

कार्हक्रमाचे अध्यक्षीय भाषण जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले. प्रास्ताविक डॉ. अशोकराव ब्राह्मणकर यांनी, तर अहवाल वाचन डॉ. नितीन तुरसकर यांनी केले. सूत्रसंचालन सदस्य राजू खवसकर यांनी तर आभार हेमंत चंदावरकर यांनी मानले.

या सभेला जिल्ह्यातील ज्येष्ठ सदस्य मोठ्या संख्येनें उपस्थित होते. यामध्ये प्रा. वामन तुरीले, डॉ. जयंत गिरीपुंजे, श्रीमती सुमन अराठे, ज्येष्ठ महिला सदस्य अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त मीरा भटृ, ॲड. कीर्तीमाला जैस्वाल, इतिहासकार सईद शेख, मुकुंद खवसकर, धनंजय मुळे, चंदूजी वंजारी, डॉ. सुखदेव काटकर, सदाशिव बनसोड, विलास केजरकर, नवीन निश्चल येनेोरकर, डॉ. रुद्रसेन भजनकर, ॲड. रत्नेश कोहरू, दिनेश पंचबुद्दे, सविता उपरीकर, संगीता डहाके, नम्रता बागडे, श्वेता शिंगाडे, पद्या खबसकर, रोशनी पडोळे, मीनल लिमजे, रोशना क्वाने, रितु पशिने, दुर्गा गोल्लर, नेहा मोटघरे, शीतल बोरसेरे, प्रा. प्रेमलाल लांजेकर, गुलाब डोये, बासुदेव निर्वान, पुरुषोत्तम गुल्लानी, समीर नवाज, मेहमुद खान, अरुण भेदे, विलास मुळे, मुकुंदा वंजारी, के. डी. बारस्कर, के. जे. राऊत यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

सभेचे उत्कृष्ट आयोजन-नियोजन डॉ. नितीन तुरसकर, हेमंत चंदावरकर, राजू खवसकर, मीरा भटृ, संगीता डहाके, डॉ. रुद्रसेन भजनकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *