शिक्षकाची वैनगंगा नदीत उडी घेवून आत्महत्या

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रेंगोळा येथे कार्यरत शिक्षकाने वैनगंगा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. २२) ला उघडकीस आली. विजय बाजीराव गरपडे (वय ५३) रा. केसलवाडा /फाटा परिसर लाखनी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. विजय गरपडे यांनी बुधवारी (ता. २०) मध्यरात्री घरून निघून कारधा पुलावर गेले होते. त्यांचे मृतदेह शुक्रवारी (ता.२२) ला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मिळून आले. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. मनमिळावू शिक्षक विजय गरपडे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज त्यांच्यावर मुरमाडी स्मशानघाटात दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *