चोपकर परिवारांचे घरे जळून खाकः परीवार उघड्यावर
या संमेलनात चोपकर परिवारही कुटुंब सहभागी झाला होता. सायंकाळाचे सुमारास नामदेव चोपकर यांचे घराला आग लागल्याचे वृत्त कळताच ग्रामवासी व संमेलनात उपस्थित असलेल्या जनसमुदायाने घटना स्थळावर धाव घेतली. परंतु, रात्रीची वेळ व त्यातच आग इतकी भयानक होती ती पाहता पाहता नामदेव चोपकर यांचे घराबरोबरच भाऊ संजय चोपकर यांचेही घराला आगीने वेडा घातला व दोन्ही भावाचे संपूर्ण घर जळून खाक झाले. चोपकर परिवाराचा कपडे शिवण्याचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचे कडे तीन शिलाई मशीनी होत्या. त्या तिन्ही मशीन व ग्राहकांचे कपडे जळून खाक झाले.
या भीषण अग्निकांडातचोपकर परिवाराचे टीव्ही, पंखे, कुलर, सोन्या चांदीचे दागिने व जीवनावश्यक वस्तू सह अन्न धान्य सुद्धा जळून खाक झाले आहे. चोपकर कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी चांदपूर वासियांनी केली आहे. संमेलनाच्या ठिकाणी तैनात असलेले सिहोरा पोलीस स्टेशनचे शिपाई महेश गिरीपुंजे यांचे सोबत गावातील दक्ष नागरिक राकेश हिंगे, मच्छिंद्र राऊत, बंडू चौधरी इत्यादीने जीवावर उद्धार होऊन घरातील सिलेंडर बाहेर काढले व मोठा अनर्थ टळला.