प्रशासनाच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी ः- येथील तहसील कार्यालयासमोर १३ तारखेपासून सुरू असलेले, धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासाठी आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. १४ एप्रिलला लाखांदूर ला पाठविलेल्या संघटनेच्या शिष्टमंडळला पालकमंत्री, महसूल मंत्री यांनी आम्ही आमदार, खासदार सर्व मिळून मुख्यमंत्री याच्या सोबत धान खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी चर्चा करून लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांचे धान घेऊ असे तोंडी आश्वासन दिले होते.

ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऑफिसमधून विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी स्वतः फोन करून आंदोलन मागे घ्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करून धान लिमिटचा तोडगा लवकर लावू असे सांगितले. या गोष्टीवर विश्वास ठेऊन संघटनेने विचार करून उपोषण मागे घेण्याचा विचार केला. १० दिवसात जर धान लिमिट वाढली नाही, या शेतकऱ्यांचे धान विकत घेतले नाही तर आणखी आमरण उपोषण सुरू करू असा इशारा देण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष आशू गोंडाने, अविनाश ब्राह्मणकर, तहसीलदार शीतल घावटे, माजी उपसभापती गिरीश बावनकुळे, भाजपा तालुका अध्यक्ष भुमेश ढेंगे, जि. प. सदस्य सुर्मिला अशोक पटले, परसोडी सरपंच रेवता पटले, नूतन ठाकरे, खुमेश बोपचे सरपंच अशोक पटले, धनराज पारधी, खुशाल पटले, डी सी येळेकर, रातीराम हजारे, दिगंबर पटले, विठ्ठल सोनावणे, शरद कोडापे,मधुकर सोनटक्के , भात गिरणी चे अध्यक्ष, रवी सिंगनजुळे,लाखोरी भात गिरणी संचालक विठ्ठल पटले, संघटनेचे सचिव, सुधाकर हटवार, धनराज बोपचे, नामदेव झळके, रघोर्ते, शिशुपाल पुराम, गुड्डू बघेले , बाळू भोस्कर, नारायण शिंदे, संदीप बोपचे. चेतन मांढरे, संजय मांढरे, संजय सोनटक्के, अंकुश सोनवणे इत्यादी. उपस्थित होते. चार दिवसापासून चालू असलेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी भरघोस पाठिंबा दिला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आणि आमदार परिणय फूके यांच्यावर विश्वास ठेऊन लिंबू पाणी पाजून उपोषण मागे घेण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा मात्र पल्लवित झाल्या असल्या तरीही हे निंबू पाणी हवेत मात्र जावू नये, अशी चर्चा यावेळी शेतकऱ्यांत दिसून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *