५८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लैंगिक शोषणाचे आरोप; त्याच अशोक खरातची पाद्यपूजा केली, रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

नाशिकः- नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राइम ब्रांच युनिट एकने अटक केली आहे. या भोंदूबाबाला १८ मार्च रोजी नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अशोक खरातने गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यांचे व्हिडीओही पोलीस तपासात उघडकीस आले आहेत. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सिन्नर तालुक्यात अशोक खरात याने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे.

या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते, तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता. आता अशोक खरातचे पाद्यपूजन करतानाचे रुपाली चाकणकरांचे फोटोही समोर आले आहेत. या सगळ्या प्रकरणावर आता रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *