चोरीचा आरोप केल्याने १७ वर्षीय मुलीची विष प्राशन करून आत्महत्या

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- चोरीचा आरोप केल्याने अल्पवयीन १७ वर्षीय मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली येथे घडली. दरम्यान नातेवाईकांनी पोलिसांवर दबावाचा आरोप केला आहे. मृतक मुलीचे नाव सविस्तर असे की, संबंधित मुलीच्या घराशेजारी असलेल्या किराणा दुकानदाराने त्या मुलीवर २५ हजार रुपये चोरी केल्या आरोप केला होता.

किराणा दुकानदाराने याची तक्रार लाखांदूर पोलीस स्टेशनमध्ये केली. यानंतर लाखांदूर पोलिसांनी दि.२ मार्च रोजी संशयित म्हणून मुलीला चौकशीसाठी लाखांदूर येथे आणले. तब्बल सहा तास चौकशी केली. चौकशी दरम्यान मुलीनी चोरीची कबुली दिल्याची माहिती आहे. त्यानंतर मुलीला घरी पाठविण्यात आले. मात्र घरीपाठविल्यानंतर काही वेळातच विष प्राशन केले. तिला उपचारासाठी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान मुलीच्या आईवडिलांनी चौकशी दरम्यान मुलीवर दबाव टाकला व मारहाण केली. त्यामुळे मुलीने टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप केला. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुलीच्या आईवडिलांनी केली आहे. पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *