नगरपंचायत लाखनीची विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक संपन्न
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- लाखनी नगरपंचायत ची विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया २४ फेब्रुवारी ०२६ रोज मंगळवार ला नगरपंचायत कार्यालय येथे पार पडली. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती पदी संदीप दिगंबर भांडारकर, स्वच्छता, वैद्यक व सार्व. आरोग्य समितीच्या सभापती पदी राजेश उद्धवराव निंबेकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी निशा संदीप मोहनकर व उपसभापती पदी कांता रविंद्र निर्वाण तसेच पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे पदसिद्ध सभापती उपाध्यक्षा लता रमेश रोडे यांचे नाव घोषित करण्यात आले. विशेष सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून आशिष घोडे, मुख्याधिकारी नगर पंचायत लाखनी, कार्यालयीन अधीक्षक अंजली बारसागडे, प्रशासकीय अधिकारी लोकेश कटरे व इतर अधिकारी तथा कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यास सहकार्य केले. यावेळी नगरपंचायतचे अध्यक्षा त्रिवेणी मनोज पोहरकर व इतर सदस्य उपस्थित होते. सदर निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.









