पवार कुटुंबातच राष्ट्रवादीचं अध्यक्षपद राहावं, महायुतीतील नेत्यांची भूमिका, सुनेत्रा पवारांना पसंती!
मुंबई:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून होत आहे. असं असताना आता राष्ट्रवादी पक्षातूनच नवी माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व कुणी करायचं याला सर्वाधिक प्राथमिकता असल्याचं सांगण्यात येत आहे. आधी पक्षाचं नेतृत्व मग उपमुख्यमंत्रिपद असा प्राधान्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय मागे-पुढे होऊ शकतो.









