१६ तास विजेसाठी शेतकऱ्यांचे करडी विद्युत कार्यालयसमोर उपोषण
यामध्ये भंडारा डिव्हीजन चे मुख्य अभियंता जैस्वाल, मोहाडी सबडिव्हीजन चे माहुर्ले, करडी येथील शाखा अभियंता तुडकाम व करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे, राजेश डोंगरे उपनिरीक्षक व शेतकरी यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार सबडिव्हीजन अधिकारी माहुर्ले यांनी १६ तास विदुत शेतकऱ्यांना देण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येईल तसेच शेतकऱ्यांना दिवसा १२ तास विद्युत पुरवठा देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यामध्ये उपोषण कर्तोचे समाधान झाल्याने सबडिव्हीजन अधिकारी माहुर्ले आणि ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी निंबु पाजून उपोषण सोडविले. यावेळी उपोषण करण्याऱ्या शेतकऱ्यांनी १२ तास विद्युत पुरवठा नेहमी सुरू ठेवावा, तसेच १६ तास विद्युत पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव तातडीने पाठवावा.
अन्यथा एक महीन्यानंतर उपोषण करण्याचा इशारा शुद्वा दिला. यावेळी उपोषण करण्यामध्ये यादोराव मुंगमोळे, ताराचंद समरीत, रोहित बुरडे, गोपीचंद गोबाडे, राधेश्याम साठवणे, मंगेश साठवणे, बलवंत सपाटे, सियाराम साठवणे, सतिश बिसने, विश्वनाथ हरीभाऊ गोबाडे, हरिश्चंद्र कापगते, राजधर शेंडे,कवळू मुंगमोळे, जगदीश गोबाडे, विरेंद्र समरीत, अजर्ुन समरीत, यशवंत गायधने, श्यामराव पिंगळे, सुरचंद बिसेन, तुलसीदास चौधरी, संतोष बाबुराव गोबाडे, गोविंदा गोबाडे, अशोक गोबाडे, अक्षय दिपक साठवणे, सोमा मडावी, सतीश ठवकर, उमेश तुमसरे, विलास बुरडे, रविंद्र तिजारे हे शेतकरी उपोषण करण्यासाठी बसले होते. यावेळी करडी पं. स. सदस्या प्रितीताई शेंडे, पं. स. सदस्या आशा बोंद्रे, करडी येथील सरपंच निलीमा ईलमे, पालोरा येथील सरपंच शिल्पा तुमसरे, निलज येथील सरपंच लिलाधर कांबळे, मोहगाव येथील उपसरपंच संतोष शेंडे, उपसरपंच यशवंत गायधने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक धनश्याम समरीत व परिसरातील महिला, पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी उपोषण कर्तोचे लक्ष दिले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.