सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
दै. लोकजन वृत्तसेवा करडी (पालोरा) ः- शालेय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्टेजवर चढण्याची संधी मिळते व विद्यार्थ्यांच्या अंगात असणाऱ्या कलेच्या माध्यमातून बोलण्याची, खेळण्याची संधी मिळत असतो व सृप्त गुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन मोहाडीचे खंडविकास अधिकारी गिरीधर सिंगनजुडे यांनी केले. मोहाडी तालुकास्तरीय तीन दिवसीय क्रीडा महोत्सव पालोरा केंद्रांतर्गत पालोरा येथे प्रथमच आयोजित करण्यात आले होते. यावेळी विजेत्यांना बक्षिस वितरण देतांना खंड विकास अधिकारी गिरीधर सिंगनजुडे तसेच जि. प. बांधकाम व शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी पं. स. सदस्य आशा बोंद्रे, सरपंच शिल्पा तुमसरचे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक घनश्याम समरीत, माजी पं. स. सदस्य गणेश कुकडे, महादेव बुरडे, पांजराचे सरपंच किरण शहारे, शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम ढेंगे, उपाध्यक्ष अमरकंठ शेंडे, माजी सरपंच चद्रदिन आराम, जांभोराचे उपसरपंच यादोराव मुंगमोडे, ग्रा. पं. सदस्य प्रमिला भोयर, मेघा कुंभलकर, चंद्रकला कुकडे, सामाजिक कार्यकर्ता उमेश तुमसरे, गट शिक्षणाधिकारी शरद कुकडकर, विस्तार अधिकारी बिसेन, डोकरीमारे साहेब, सेवाराम गोदुंळे, सतीश भोयर, भिमराज भोयर, ओमकार लांजेवार, प्रिया ठाकरे, कविता तुमसरे, नलुताई उईके, दिक्षा गाढवे, उज्वला मोटघरे, केंद्र प्रमुख कमलेश दुपारे, ग्राम अधिकारी अक्षय शेळके व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय भांडारकर यांनी केले तर पाहुण्यांचे आभार शिक्षण विस्तार अधिकारी शंकर नखाते यांनी केले. प्रथमच पालोरा गावाला तालुका स्तरीय क्रिडा सम्मेलन महोत्सव स्पर्धा मिळाला असल्यामुळे गावात उत्साह निर्माण झाला होता.तिनदिवस एक यात्रेचा रूप दिसत होता. विजेत्यांना चमुंना जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात खेळायला मिळणार आहे. पालोरा गावकऱ्यांनी या महोत्सवाची उत्तम व्यवस्था केली होती. तिन्ही दिवस सकाळी नास्ता, दुध, दुपारी गोड जेवन व रात्री जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती.
मैदानात उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती. प्रत्येक मैदानाच्या सभोवताल लाखडी खांबाचे कंपाऊंड करण्यात आले होते. सर्व खेळ शांतपणे पार पडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त पालोरा ग्रामवासियांनी व एकलव्य क्रिडा मंडळ, सार्वजनिक नव दुर्गा उत्सव मंडळ,बाल गणेश उत्सव मंडळ, हनुमान देवस्थान समिती, ब्रह्मास्त्र स्पोर्टीग क्लब, युवा फाउंडेशन, टायगर स्पोर्ट,गौरी भजन मंडळ, बालमित्र नाट्य मंडळ, सिध्दार्थ बौद्ध विहार समिती, शिल जन्मोत्सव मंडळ, नवजागृत भजन मंडळ, बिरसा फाईटर संघटना, सर्योदय नाट्य मंडळ पालोरातील सर्व युवकांनी सहकार्य केले.









