साकोलीत सेंदूरवाफा नगरपरिषदेत महिलाराज, अपक्ष रोहिणी मुंगुलमारे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ

साकोली :- मागील बऱ्याच दिवसापासून साकोली सेंदुरवाफा नगरपरिषदेचे सत्तेचे समीकरण आज शेवटी उलगडले असून साकोली शेंदुर्वाफा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून अपक्ष उमेदवार रोहिणी मुंगुलमारे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपाध्यक्ष बनविण्यात आले असून स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसच्या गटातून एडवोकेट दिलीप कातोरे यांची तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नितीन खेडीकर यांची विकृत सदस्य वर्णी लागली
साकोली शेंदूर वाफा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष देव श्री मनीष कापगते यांच्यासह भाजपाचे आठ नगरसेवक निवडून आले तसेच काँग्रेसच्या गटातून सात नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार गटातुन एक शिवसेना शिंदे गटातून एक आणि तीन अपक्ष असे नगरसेवक निवडून आले मात्र अपक्ष नगरसेविका रोहिणी मंगलमारे व अपक्ष नगरसेवक सपन कापगते यांनी भाजपाला पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नयन पटेल यांनी सुद्धा भाजपाला समर्थन दिल्याने भाजपाचे संख्याबळ थेट अकरावर पोहोचले यामुळे साकोली शेंदुराफा नगरपरिषदेत भाजपाची बाजू भक्कम झाली त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर रोहिणी मुंगुलमारे यांची नियुक्ती केल्यामुळे भाजपाचे ताकद साकोली शेंदूर वाफा नगरपरिषदेत वाढली व अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्ही पद महिला वर्गात असल्याने महिलांमध्ये महिला वर्गात आनंदाचे वातावरण असून आता पाच वर्ष नगर परिषदेत महिला राज राहील असे आता सामान्य नागरिकाच्या तोंडून निघत आहे
स्वीकृत सदस्याकरिता काँग्रेसच्या गटामध्ये रस्सीखेच होती परंतु पक्षश्रेष्ठीकडून एडवोकेट दिलीप कातोरे यांचे नाव आज एन वेळेवर घोषित केले त्यामुळे काँग्रेसचे स्वीकृत सदस्याचे दावेदार हिरमुसले भारतीय जनता पार्टीच्या वतीने नितीन खेडीकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून आज साकोली नगरपरिषदेच्या सभागृहात घोषणा करण्यात आली.









