संविधान म्हणते मतदान करा अन् निवडणूक आयोग म्हणते करुनच दाखवा; देवेंद्र फडणवीस अन् चोर कंपनी हारली म्हणत उद्धव ठाकरेंनी सगळंच काढलं
मुंबईः- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईत १५ जानेवारी रोजी सकाळी मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे म्हणाले की, मतदान काही नवीन विषय नाही.
आता असा प्रश्न विचारायला गेला पाहिजे शाई पुसली गेली का? भाजप आणि मित्र पक्षांनी अनेक प्रयत्न केलेत. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी बरेच घोटाळे केले. बाईचा फोटो दाखवलाय. बाईचंनाव रविंद्र असेल का? भाजपच्या पाट्या मतदान केंद्रावर ठेवल्या जातायत. बोटावरची शाई पुसली जात आहे. निवडणूक आयोग आणि आयुक्त कसला पगार खात आहेत? ९ वर्षांनंतर निवडणूक होत आहे. नवीन मतदार येतात, जातात, मात्र सुधारणा कसल्याही दिसत नाही, असा हल्लाबोल त्यांनी निवडणूक आयोगावर केला.









