भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; “बिनविरोध’ वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल

मुंबई:- राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून भाजपने निवडणुकांपूर्वीच ४४ नगरसेवक जिंकले आहेत. कारण, कल्याण डोंबिवलीसह काही महापालिकेत भाजप महायुतीचे जवळपास ६८ नगरसेवक बनिविरोध निवडून आले आहेत. त्यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून मनसेनं न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय झाला आहे, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवर भाष्य केलं.

नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत, जेष्ठ नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे म्हणत नाना पटोले यांनी नाव न घेता भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना चिमटा काढला. तसेच, विधानसभा अध्यक्षांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणलेल्या दबावरुन त्यांना बदलण्याची मागणीही पटोले यांनी केली. विधिमंडळाची परंपरा आहे, लोकांना न्याय मिळेल, विरोधकांना न्याय मिळेल ही भूमिका असली पाहिजे. राजकारणी म्हणून त्यांना वावरता येत नाही, त्यामुळे भाजपचे त्यांना बदलावे,असेही नाना पटोले यांनी म्हटले. तर, निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, असे म्हणत निवडणूक आयोगावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. सरकार प्रचारात व्यस्त, जनता वाऱ्यावर आहे, म्हणूनच शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत आणि नेतेमंडळी हेलिकॉप्टरने फिरत आहे. ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, तरीही मी मोकळा आहे, अजित पवारांचे हे वक्तव्य सूचक आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *