उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम

मुंबईः- मुंबईचे ममदानीकरण होऊ देणार नाही, अशी टिप्पणी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी प्रचारसभेतून केली. या टीकेला उत्तर देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया हा कोण चाटम? असे म्हणत खिल्ली उडवली. यानंतर अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांनी मला शिवी नाही दिली, तर प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली. मराठी माणसाचा अपमान केला. मी सामान्य कुटूंबातून आलो आहे, कोणाच्या आशीर्वादाने आलो नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *