पिकअपच्या अपघातात एक तरुण ठार तर तीन जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- लग्न कार्य आटोपून डि. जे. धुमाल पार्टीचे लोक परत येत असतांना पिकअपचा अपघात झाला. यात एकाच जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रामटेक तालुक्यातील महादुला जवळ घडली. मयुर रामेश्वर मेश्राम (२८) रा. पालोरा असे मृतकाचे नाव आहे. तर जखमीत निलेश शामलाल ठवकर (२७) रा. पालोरा, कुणाल सहादेव मेश्राम (२२) रा. केसलवाडा व एकाचे नाव कळले नाही यांचा समावेश आहे. सविस्तर असे की, ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी रामटेक तालुक्यामध्ये लग्न कार्यक्रमाला मोहाडी तालुक्यातील कुशारी येथील ईश्वर भेलावे यांची डि. जे. धुमाल पार्टी गेली होती. लग्न कार्यक्रम निपटवून रात्री तिन वाजेच्यादरम्यान डि. जे. असलेली पिक अप वाहनाने गावाकडे येत असतांना महादुला जवळपास चालकाचे संतुलन बिघडले.

यामुळे पिकअप वाहन रस्त्याच्या खाली उतरली. ती पिकअप झाडाला आदळल्यामुळे गाडीत बसलेल्यापैकी मयुर रामेश्वर मेश्राम हा जागेवर ठार झाला तर निलेश शामराव ठवकर, कुणाल सहादेव मेश्राम व एकाचे नाव कळले नाही हे तिघे जखमी झाले. तिघांनाही नागपूर येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रामटेक पोलीसात घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मृत्यू पावलेला मयुर रामेश्वर मेश्राम याला रामटेक रूग्णालयात शवविच्छेदन करण्याकरीता घेवून गेले असून ३ वाजता परीवारांना मृतदेह सोपवण्यात आले. पालोरा येथील बांध तलाव येथे सायंकाळी अंतिम संस्कार करण्यात आले. मृतक विवाहित असून एक मुलगी आहे. त्यामुळे पत्नीला धिर देणारा पती गेल्याने मोठे संकट कोसळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *