वांढरा येथील नविन शौचालय ईमारतीचे स्लॅब कोशळले ; ग्रामसेवकच दुसऱ्याच्या माध्यमाने करतो ग्रामंपचायतची कामे…
बांधकाम साहित्य निकृष्टदर्जाचे वापरून शासनाच्या निधीला हरताळ फासण्याचा प्रकार वाढंरा गट ग्रामपंचायत येथे दिसून येत आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशीकरून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी गावातील नागरीक करीत आहेत. विशेषता सदर बांधकाम वांढरा ग्रामपंचायतचे ग्रामसेवकच दुसर्याच्या नावाने कंत्राट घेत स्वता करीत असल्याचे गावातील नागरीकांचे म्हणने आहे.या अगोदरही करोडो रुपयांच्या बांधकामात वांढरा गट ग्रामंपचातचे ग्रामशेवक यांनी प्रशासनाची दिसाभुल करत संबधीत कंत्राट दाराच्या नावाने काम करीत लाखो रुपयांची कामेकरत पैस्याची उचल केल्याचे गावतील नागरीकांनी सांगीतले आहे. वाढंरा गावातील नागरीकांनी निकृष्ट झालेल्या व स्लॅप कोसळलेल्या त्या शौचालयाच्या बांधकामासोबतच ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या करोडो रुपयांच्या जल जिवन मिसन व संपुर्ण विकाश कामांच्या बांधकामाची चौकशी करुन संबधीत ग्रामसेवक व संबधीत कंत्राटदार यावर कायदेशीर कारवाही करन्याची मागणी आता वांढरा गावात जोर धरु लागली आहे.
वांढरा गावात अंगनवाडी परिसरात तिन लक्ष रुपयाची निधी शौचालय बांधकामाकरीता मंजुर झाली. तसे त्या ठिकानी कामही सुरू करन्यात आले. पण स्लॅप टाकताच त्या शौचालयाचे स्लॅप कोसळले. ज्यामुळे संबधीत कंत्राट दाराकुन काम करवुन घेत असलेले ग्रामसेवक व संबधीत कंत्राटदार यांचे बिंग फुटले. संबधित विभागाच्या वरीष्टानीं या कामाची तात्काळ चौकशी करीत या दोषी वर कायदेशीर कारवाही करावी व या अगोदरही वांढरा ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या करोडो रुपयाच्या कामाची चौकशी करन्यात यावी. ज्यात अशी लाखो रुपयाची कामे आहेत.जि पुर्णत्वात आली नसुनही त्या कामाची संपुर्ण निधीची उचल वांढरा ग्रामपंंचायतच्या ग्रामसेवकांच्या मेहरबानीने करण्यात आली आहे.