
ठाणेः- ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे का?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात देखील जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. अशातच राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बाबत भाष्य करत शिवसेनेच्या सदस्यांनी देखील जनता दरबार घेतले पाहिजे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सुटतील आणि जनतेचं भलं होईल, असे म्हणत गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून एकप्रकारे समर्थन करण्यात आले आहे.