गोसे उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी आम. भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- गोसे जलप्रकल्प पूर्णत्वास आले असले तरीही याच्या उजव्या कालव्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे लक्षात येताच आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि उजव्या कालव्याच्या लाभार्थी शेतकऱ्यांकरिता पाणी सोडण्या बद्दल खडसावून सांगितले. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी तीन दिवसात पाणी सोडण्याची हमी दिली असून आता या कालव्यावर निर्भर असलेल्या भंडारा, पवनी आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान वहन करावे लागणार नाही. यावेळी त्यांच्या सोबत चिमुर विधानसभा क्षेत्राचे आम. बंटीभांगडिया सुद्धा उपस्थित होते. गोसे जलप्रकल्पाच्या लाभ क्षेत्रास उजव्या आणि डाव्या अश्या दोन कालव्यात विभाजित करण्यात आले आहे.

यातील उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रात भंडारा विधान सभाच नव्हे तर चिमुर विधानसभेचाही समावेश होतो. दर वर्षी या क्षेत्रातील शेतकरी उजव्या कालव्याच्या पाण्याची मागणी करीत असतात परंतु संबंधित विभागाचे अधिकारी कालव्याच्या दुरूस्तीचे कारण पुढे करून पाणी देण्यास टाळत असत. या संबंधी शेतकऱ्यांनी आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या कडे दाद मागितली असता आम. भोंडेकर यांनी आज गोसे प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांची तत्काल बैठक आयोजित केली. नागपूर येथील सिंचन भावनात झालेल्या बैठकीत सिंचन विभागाचेअधीक्षक अभियंता राजेश पाटील व ब्रह्मपुरीचे कार्यकारी अभियंता हाटे यांच्यासह भंडारा, पवनी व ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी उजव्या कालव्यातून पाणी न सोडण्याचे कारण विचारले असता अधिकाऱ्यांनी उजवा कालवा डॅमेज असल्यामुळे रिपेअर करणे आवश्यक असल्याचे निदर्शनात आणून दिले.

यावर शेतकऱ्यांनी आम. भोंडेकर यांना सांगितले की गत वर्षी सुद्धा अधिकाऱ्यांनी हेच कारण सांगून पाणी सोडण्यास नकार दिला होता आणि सिंचन अभावी पिकांचे नुकसान वहन करावे लागले होते. सोबतच उपरोक्त तालुक्यातीलशेतकऱ्यांनी उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा आग्रह धरला यावर आम. भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले की, शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता गोसे खुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे रिपेरिंग व मेंटनस चे काम पुढे ढकलावे आणि या वर्षी कालव्यात पाणी सोडावे. चर्चे अंती तीन दिवसात उजव्या कालव्याचे सर्वेक्षण व प्रत्यक्ष पाहणी करून कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याची हमी अधिकाऱ्यांनी आ. भोंडेकर यांना दिली सोबतच कालव्याचं रिपेरिंग व मेंटनसचे कार्य पुढच्या वर्षी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *