बाहेरील लोक तंबू घालून गावात डेरा लावत असतील तर सावधान

दि. २८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजल्यापासून सहवन क्षेत्र तुमसर अंतर्गत तुमसर रेल्वे स्टेशन, तुमसर देव्हाडी स्टेशन व जांभोरा बीटा अंतर्गत येत असलेल्यामौजा खडकी, पालोरा, केसलवाडा, बोंडे गावाच्या शेजारी तंबू ठोकून वास्तव्य करणाऱ्या लोकांची तपासणी करताना माननीय सी. जी. राहंडाले साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर तसेच पी. डी. चिचमलकर, वनपाल गस्तीपथक तुमसर तसेच सी. डब्ल्यू. सार्वे, वनरक्षक शिवाजी जुंबाड, अनिल झंझाड तसेच इतर वन कर्मचारी वनमजूर सामूहिक वस्ती करण्यात आली डेरे लावून, तंबू ठोकून राहणाऱ्या लोकांची आधार कार्ड इत्यादी तपासणी करण्यात आली.