जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आदिवासी बांधवांचा आक्रोश मोर्चा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “बोगस हटाव- आदिवासी बचाव, आरक्षण वाचवा-संविधान वाचवा’ अशा घोषणांनी दुमदुमलेल्या आदिवासी बांधवांच्या आक्रोश मोर्चाने ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. दसरा मैदानावरून निघालेल्या या मोर्चात जिल्ह्यातील सर्व सात तालुक्यांतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा सभेत रूपांतर झाल्यानंतर आदिवासी नेत्यांनी शासनाच्या धोरणांवर तीव्र शब्दात टीका करत अन्याय दूर करण्याची मागणी केली. बंजारा व इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमाती प्रवर्गातसामावून घेऊ नये, आदिवासी अनुशेष भरावा, जिल्ह्यात पेसा कायदा लागू करावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. सायंकाळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.







