२१०० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा, सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याचे आदेश

मुंबई:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २३ सप्टेंबर रोजी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यभरात ७० लाख एकरच्यावर आतापर्यंत नुकसान झालंय. यासाठी २१०० कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करुन मदत देण्याचे आदेश आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून देण्यात आले. जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना १ हजार ३३९ कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून २३ सप्टेंबर रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *