डॉ. पंकज भोयर यांनी संवेदनशीलतेने ऐकली प्रत्येक नागरिकाची समस्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी भंडारा येथे पहिला जिल्हास्तरीय जनता दरबार आज घेतला. या दरबारात दुपारी दोन वाजेपर्यत २१६ निवेदन प्राप्त् झाली होती. जिल्हयातील सर्व तालुक्यातील नागरिकांनी आज समस्या, निवेदन घेऊन पोलीस बहुददेशीय सभागृहात गर्दी केली होती. यापूर्वी पालकमंत्री यांच्या निर्देशान्वये ८ व १५ संप्टेबर रोजी तहसील पातळीवर दोन जनता दरबार आयोजित करण्यात आले होते. या जनता दरबाराला आमदार परिणय फुके,आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार सुनिल मेंढे, जिल्हाधिकारी सावनकुमार, पोलीस अधिक्षक नुरूल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे, भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी सर्व विभागप्रमुख व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जनता दरबारात सक्रीय काम केले. तसेच या उपक्रमातुन प्रशासन अधिक लोकाभिमुख होत असल्याचे सांगितले. आमदार राजु कारेमोर यांनी लोकशाही पध्दतीने नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा हा उपक्रम चांगला असून या आयोजनाबददल समाधान व्यक्त केले. पालकमंत्री जनता दरबार हा गावपातळीवरील समस्या/ निवेदनांचा निराकरण करण्याचा उपक्रम असुन हा याव्दारे तालुकास्तरावरील समस्या मार्गी लागत ज्या प्रलंबीत राहतील. भंडारा जिल्हयातील शेतकऱ्यांच्या निवेदनाव्दारे प्राप्त मागणी लक्षात घेवून शासनाने रब्बी धान खरेदी मुदत वाढवली असल्याचे त्यांनी नमुद केले. श्री. भोयर पुढे म्हणाले की, तालुकास्तरावर पालकमंत्री जनता दरबारामध्ये २०० च्यावर तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्यातील ८० टक्के तक्रारी या निकाली काढण्यात आलेल्या असून उर्वरित तक्रारी निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे .

आपल्याला पालकमंत्री जनता दरबार हा कार्यक्रम नेहमीसाठी राबवायचा आहे. हा उपक्रम सर्व यंत्रणांनी गांभिर्याने घ्यावा.जिल्हयात सात नमो उद्यानांना मंजुरी देण्यात आली आहे. या जनता दरबारात नागरिकांना निवेदनावर टोकन क्रमांक देण्यात आले होते.तसेच तालुकानिहाय नागरिकांची टोकनक्रमांक पुकारून त्यांना व्यासपीठावर पालकमंत्री महोदयांकडे प्रकरण सादर करण्यात येत होती.यावेळी संबंधित विभागाच्या अधिकायांना आवश्यकता वाटल्यास विचारणा करून पालकमंत्री निर्देश देत होते. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, संचालन आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी अभिषेक नामदास यांनी व आभार प्रदर्शन लीना फलके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *