तुमसरात इतिहास घडला, ४५० गुणवंतांचा सत्कार

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर तुमसर शहराने इतिहास घडविला. आमदार राजू कारेमोरे व मित्र परिवार यांच्या पुढाकारातून शुक्रवार व शनिवारी दोन दिवसीय दुहेरी भजनसोहळा पार पडला. रविवारी एका बाजूला ४५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तर दुसऱ्या बाजूला दोन दिवसीय भजन स्पर्धेची दैदिप्यमान अंतिम फेरी रंगली. ठिकाण होते शकुंतला सभागृह, आणि उपस्थितांची गर्दी प्रचंड होती. १० वी व १२ वी परीक्षेत ७५% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, प्रमाणपत्र व किट देऊन गौरविण्यात आले. या वेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध युवा व्याख्याते जितेंद्र दादा आसोले यांनी काळजाला भिडणारे व्याख्यान देत आई-वडिलांचे महत्त्व, त्यांच्याप्रती जबाबदारी आणि संस्कारमूल्ये यावर प्रभावीविचार मांडले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांनी अभ्यास कसा करावा याविषयी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन केले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित दोन दिवसीय भजन स्पर्धेत तब्बल ३३ मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कठीण स्पर्धेतून १० मंडळांची फायनलसाठी निवड झाली. त्यात महिला भजन मंडळ, गजानन नगर प्रथम क्रमांक दुर्गा भजन मंडळ, माकडे नगर – द्वितीय क्रमांक पुरुष माऊली भजन मंडळ, श्रीराम नगर – तृतीय क्रमांक नवदुर्गा भजन मंडळ, इंदिना नगर – चतुर्थ क्रमांक भजन मंडळ, मालवीय नगर पाचवा क्रमांक सेमीफायनल गाठलेल्या प्रत्येक सहभागी सर्व ३३ मंडळांना भेट, प्रमाणपत्र, किट व साल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या अविस्मरणीय कार्यक्रमामागे आमदार राजू कारेमोरे यांचे मार्गदर्शन, तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते इंजी. सागर गभने व त्यांच्या चमुची अथक मेहनत होती.

गुणवंतांचा सन्मान आणि सांस्कृतिक वारशाचा उत्सव अशा दुहेरी मेजवानीमुळे तुमसरवासीय मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाला देवचंद ठाकरे, किशोर चौधरी, योगेश सिंगनजुडे, अनिता नलगोपुलवार, राजेश देशमुख, यासीन छवारे, सदाशिव ढेंगे, रितेश वासनिक, गुलराज कुंदवानी, मनोज झुरमुरे, प्रिति शेंडे, आशा बोंदरे, निशित वर्मा, अखिल चकोले, पमा ठाकूर, सरोज भुरे, विजया चोपकर, गीता कोंडेवार, कल्याणी भुरे, जयश्री गभने, नंदा डोरले, मधुमती साखरवाडे, शालिनी पेठे, नेहा मोडघरे, करुणा धुर्वे, मीना गाढवे, परमेश्वर नलगोपूलवार, प्रदीप भरणेकर, रोहित बुऱडे, संकेत गजभीये, बालेश्वर लांजेवार यांच्यासह असंख्य मान्यवर व नागरिकांनी हजेरी लावली. तुमसरातील हा सोहळा फक्त गणेशोत्सवापुरता मर्यादित न राहता, संस्कार, शिक्षण व परंपरेचा संगम ठरला. त्यामुळेच याला “ऐतिहासिक क्षण’ म्हणून नोंदवले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *