शेतात गवत कापत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आला वाघ
गोंदिया:- सडक अजर्ुनी वनपरिक्षेत्रातील भादुटोला गाव संकुलातील भातशेतीत गवत तोडणारे शेतकरी वाघाच्या अमोरा समोर आल्याची घटने घटना रविवारी दुपार च्या सुमारास घडली. वाघ हल्ला करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पळून जाऊन आपले प्राण वाचवले. त्यांनी जोरात आरडा ओरड करत वाघाला हाकलून लावले, पण वाघ जवळचा उसाच्या शेतात जाऊन लपून बसला. या घटनेतभादुटोला येथील रहिवासी रामू मन्साराम कापगते (४२) पळून जाताना पडल्याने किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि एनएनटीआर बचाव पथक घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला.
या घटनेमुळे या परिसरातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. रविवारी पिपरी गावातील राका परिसरातही हाच वाघ सायंकाळच्या सुमारास दिसला. गोंदिया जिल्ह्यात या दिवसात शेतात भाताचे पीक घेतले जाते. शेतकरी दिवसभर शेतात तळ ठोकून पिकांचे रक्षण करतात. दरम्यान शेतात धनासोबत उगवलेले गवत काढून ते जनावरांसाठी चारा घेण्यासाठी शेतात येतात.पळसगाव ग्रामपंचायत अंतर्गत येथील शेतकरी आणि इतर शेतात चारा काढत होते. तिथे वाघ आधीच घात करून बसला होता. शेतकऱ्यांनी वाघाला पाहताच हो हल्ला केला असल्याने वाघ पळून गेला आणि त्याला बघून शेतकरी ही तिथून पळून आपले प्राण वाचवले. या घटनेत शेतकरी जखमी झाला आहे.
वाघ हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता असे सांगितले जात आहे पण शेतकऱ्यांनी आवाज करत त्याला तेथून हाकलून लावले पण वाघ जवळच्या शेतात घुसला. माहिती मिळताच वन विभागाच्या एनएनटीआरची टीम घटनास्थळी पोहोचली. जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर वाघाचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. या दरम्यान, वाघ गोंडउमरी परिसराकडे गेल्याचे वनविभाच्या पथकांनी बघितले.







