दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रोहणा गावाजवळून वाहणाèया गायमुख नाल्यातून रोहणा येथील वाळू चोरट्या कडून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू चोरी केल्या जात आहे. याकडे पोलिस विभाग मोहाडी व तहसीलदाराचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. रेती माफियांशी आर्थिक संगनमत असल्याने दोन्ही विभाग वाळू चोरट्यावर कारवाई करण्यास कचरत असल्याचा आरोप गावकèयांनी केला आहे . रोहणा ते दहेगाव रस्त्याच्या मधातून इलेक्ट्रिक डीपी जवळून एक पांदन रस्ता आहे. त्या पांदन रस्त्याने रोहणा येथील वाळू तस्कर गायमुख नाल्यात चार ते पाच ट्रॅक्टर नेऊन तेथून जेसीबीने ट्रॅक्टर भरून वाळू चोरी करीत आहेत. हा प्रकार रोजच सुरू आहे. पावसाळ्यात गायमुख नाल्याला पूर आल्याने पुरा सोबत बारीक पांढरी शुभ्र वाहत आली आहे. याच संधीचा फफायदा वाळू तस्कर घेत आहेत. या वाळू चोरी मुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रोहणा येथील वाळू तस्कर सायंकाळी ८ वाजता पासून पाच ते सहा ट्रॅक्टर जेसीबी ने वाळू भरून रात्रभर गावात वाहतूक करतात.
रात्रभर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर सुसाट वेगाने धावत असल्याने आवाजा मुळे गावकèयांची झोप उडाली आहे. रात्रभर चालणाèया ट्रॅक्टर मुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खुलेआम वाळू चोरीचा प्रकार सुरू असतानाही महसूल व पोलिस विभाग डोळ्यावर पट्टीबांधून धुतराष्टड्ढाची भूमिका निभावत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी भंडाèयावरून येऊन अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडतात. मात्र मोहाडी पोलिस आणि महसूल विभाग यांना हे अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर दिसत नाही का? असा प्रश्न गावकèयांनी उपस्थित केला आहे. हे वाळू तस्कर गावकèयांना व बाहेर चढ्या दराने वाळू विक्री करीत आहेत. त्या कमाईतून त्यांनी नवनवीन वाहने खरेदी केले आहेत. रात्रभर येथे अवैध वाळू व्यवसाय सुरू असूनही यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केल्या जात नाही. अनेक तक्रारी गावकèयांनी केल्या मात्र वरिष्ठ अधिकाèयांनीही लक्ष दिले नाही.