जिओ टॉवरवरील कॉपर केबल चोरीचा पर्दाफाश; पलंगाखालून २० हजारांचा मुद्देमाल जप्त! स्थानिक गुन्हे शाखेची डब्बा येथे कारवाई

तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबऱ्याच्या आधारे आरोपी जेरबंद

दै. लोकजन वृत्तसेवा

गोंदिया :– मोबाईल नेटवर्क सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जिओ टॉवरवरील कॉपर पॉवर केबल चोरीच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील डब्बा येथील रिलायन्स जिओ टॉवरमधून चोरीला गेलेल्या २० हजार रुपये किमतीच्या कॉपर केबल प्रकरणात पोलिसांनी सुरेंद्र चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्या घरातील पलंगाखाली लपवून ठेवलेल्या दोन नग केबल पंचांसमक्ष जप्त करण्यात आल्या.

२९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० ते रात्री ८ वाजताच्या दरम्यान डब्बा येथील रिलायन्स जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरमधून अंदाजे २० फूट लांबीची दोन कोर कॉपर पॉवर केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या केबलची किंमत सुमारे २० हजार रुपये होती. याप्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोबाईल टॉवरमधील महत्त्वपूर्ण साहित्य चोरीला गेल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती दिली. पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ नोव्हेंबर रोजी पथक डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास करीत असताना तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबऱ्यामार्फत सुरेंद्र चौधरी याच्याबाबत माहिती मिळाली.

पोलिसांनी डब्बा येथे शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने केबल चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेल्या केबल घरात लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी युवकांमधील व्यसनाधीनता आणि मोबाईलचा अतिवापर यावरही त्यांनी भाष्य केले. मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी शिक्षण, शिस्त, संस्कार आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळवावे, असे सांगितले. दुर्बल आणि वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणल्याशिवाय समाजाची प्रगती पूर्ण होऊ शकत नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले.

मध्यप्रदेशात चार वेळा आमदार, खासदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेल्या डॉ. बिसेन यांचा दीर्घ सार्वजनिक जीवनाचा अनुभव त्यांच्या मार्गदर्शनातून प्रतिबिंबित झाला. डॉ. संजीव रहांगडाले आणि अजय रहांगडाले यांनी सूत्रसंचालन केले, तर भूपेंद्र बोपचे यांनी आभार मानले. सत्कार सोहळ्याचे महत्त्व केवळ सन्मानापुरते मर्यादित न राहता शिक्षण, सामाजिक एकोपा, शेतकरी कल्याण आणि राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देणारे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *