माडगी ते गोबरवाही सिहोरा मार्गे डांबर रस्ता मंजूर दोन दिवसापूर्वीच झाले सीमांकन

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- माडगी ते गोबरवाही सिहोरा मार्गे डांबर रस्ता मंजूर झाला असून दोन दिवसांपूर्वीच सीमांकनाचे काम पूर्ण झाले असल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सुत्रान्वये मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. या रस्त्याची सुरुवात माडगी गावा पासून सुरु होणार आहे. माडगी, बाम्हणी, कोष्टी, बोरी, उमरवाडा, तामसवाडी, रेंगेपार, पांजरा, परसवाडा, सिलेगाव व पोलीस स्टेशन मार्गे सिहोरा पेट्रोल पंप टी पॉर्इंट, बोरगाव, सोनेगाव, मुरली, सोदेपुर मार्गे खंदाळ, गुडरी, सीतासावंगी व रेल्वे क्रॉसिंग मार्गे तुमसर ते बावनथडी मुख्य मार्गावर असलेल्या गोबरवाही गावाला जोडले जाणार आहे.

सदर रस्ता हा १०० फुटाचा असून मध्यभागी ४० व दोन्ही बाजूला ३०-३० फुटाचा असणार आहे. हा रस्ता काही गावाच्या मध्यभागी तर काही गावातून बायपास काढले जाईल यात काही शेतकèयांची शेती तर काहींचे घरे अधिग्रहित केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सदर रस्ता हा ४० ते ५० किलोमीटर लांबीचा असून काही भागात डांबरीकरण तर काही भाग सिमेंट रस्ता बांधकाम असल्याचेही सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *