कुणबी समाजाच्या हक्कांसाठी संघटित लढ्याचा निर्धार !
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :– कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळावे, तसेच समाजाच्या हक्क आणि अधिकारांसाठी संघटितपणे आवाज उठविला यावा, या उद्देशाने राष्ट्रीय कुणबी महासंघाने भंडारा जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. शासकीय विश्रामगृहात शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी प्रा. उमेश सिंगनजुडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष डी. के. आरीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला भगीरथ धोटे, प्रा. अशोक छुटे, माधवराव फसाटे, राजेश राऊत आणि पांडुरंग फुंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
उपाध्यक्षपदी महेंद्र मेंढे, कार्याध्यक्षपदी सुभाष अजबले, सचिवपदी प्रा. अंकुश तितीरमारे, सहसचिवपदी दिनेश फेंडर, जिल्हा संघटकपदी नीळकंठ कायते, तर प्रसिद्धीप्रमुखपदी अरुण लुटे यांची निवड करण्यात आली.
सदस्य म्हणून भगीरथ धोटे, माधवराव फसाटे, पांडुरंग फुंडे, प्रा. अशोक छुटे, राजेश राऊत, डॉ. आशिष मोटे, अरविंद हलमारे, महेंद्र राऊत, सुखदेव घरड आणि राजेश ईसापुरे यांची निवड झाली.
उपशाखांतील मतभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन
मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष डी. के. आरीकर यांनी कुणबी समाजातील सर्व उपशाखांनी एकत्र येऊन समाजाच्या हक्क आणि अधिकारांसाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. प्रा. अशोक छुटे यांनी कुणबी समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले.
या बैठकीला विभागीय सदस्य संजय मते, तेजराम बहेकार, ज्ञानेश्वर फेंडर, उद्धव कठाणे, प्रकाश वाट, गुणवंत पंचबुद्धे, तीर्थराज चचाणे, शंकर उपासे, विलास निंबार्ते, नाना राघोर्ते, सुभाष गोंधोळे, प्रा. प्रशांत कठाणे आणि योगेश महावाडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन प्रा. उमेश सिंगनजुडे यांनी केले, तर आभार प्रा. अंकुश तितीरमारे यांनी मानले.
भगीरथ धोटे यांनी संत तुकाराम महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत परिपत्रकात समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटित समाजालाच हक्क, अधिकार मिळतात, असे ओबीसी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव फसाटे यांनी सांगितले.









