दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिनाच्या निमित्ताने शहरातील निसर्गाच्या सानिध्यात पहाडी वर ‘चला ट्रॅकींग करूयाङ्क चे आयोजन ङ्क्रिडम युथ फाऊंडेशनने रविवार १९ जाने. ला केले होते. सातत्याने होत असलेल्या या उपक्रमात यंदा दोनशेहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यामध्ये शेवटी समारोप सोहळ्यात ईश्वर चिठ्ठीने सर्व ट्रॅकर्सना सायकल, शालेय बॅग, स्मार्ट वॉचेस बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात आली. श्रीराम मंदिर, प्रगती कॉलनी चौक येथे या ‘चला ट्रॅकींग करूयाङ्क शुभारंभ प्रसंगी जि. प. सभापती मदन रामटेके, डॉ. आर. टी. चंदवानी, क्रीडा संघटकशाहेद कुरैशी, होमगार्ड समादेशक राजेश बैस, जितेंद्र ठाकूर, माजी नगरसेवक अॅड. मनिष कापगते, इंजिनीयर संदीप बावनकुळे, रिलायन्स शाखेचे श्याम शेंदरे, रवि परशुरामकर, अमोल हलमारे, जफार शेख आदी उपस्थित होते. निसर्गाच्या सानिध्यात पहाडीवरून १ कि.मी. लांब श्री शिवमंदिर गडकुंभली पायथ्याच्या समारोप स्थळी दोनशेहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींनी ट्रॅक करीत हे अंतर गाठले व निसर्गरम्य ऐतिहासिक पहाडीवर सौंदर्याचा आनंद लुटला.
समारोप सोहळ्यात डॉ. अशोक कापगते, बक्षिस आयोजक श्याम शेंदरे, हरगोविंद भेंडारकर, पुष्पा कापगते उपस्थित होते. येथे भाग घेणाèया सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी ट्रॅकर्सच्या क्रमांक नावावरून त्यांची लहान मुलांच्या हातांनी ईश्वर चिठ्ठी काढली यात वैष्णवी मनोज गजघाट या सामान्य परीवारातील विद्यार्थीनीला प्रथम पारितोषिक रेंजर सायकलरिलायन्स शाखेचे श्याम शेंदरे यांकडून देण्यात आले. यात संघर्षम सोशियल फाऊंडेशन तर्फे ५, आशिष गुप्ता तर्फे ३ शालेय बॅग व ३ स्मार्ट वॉचेस ङ्क्रिडम वतीने देण्यात येत सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या आयोजनात ङ्क्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे, कार्तिक लांजेवार, हेमंत चांदेकर, समीर सूर्यवंशी, कार्तिक लांजेवार, स्वामी नेवारे, दिपक हिवरे, अल्फेज खान, मार्शल वरकडे, चिराग जनबंधू, प्रवीण कांबळे, जय मल्लानी, अभिषेक परचाके, प्रवीण पटोले, संजय गजघाट, हितेश शहारे व सदस्यगणांनी विशेष परिश्रम घेतले. यादरम्यान संचालन व्यवस्था अॅड. मनिष कापगते व शाहेद कुरैशी यांनी सांभाळली.