दोन टिप्पर व एक जेसीबी जप्त
तसेच मांडवी शेतशिवारात एक विना क्रमांकाचा टिप्परचा चालक आरोपी सम्यक भगवान गणवीर, रा. पालगाव व विना क्रमांकाचा जेसीबीचा चालक आरोपी अजर्ुन मोतीराम मेश्राम, रा. मकरधोकडा, ह.मु. आनंद नगर, कारधा, यांनी टीप्पर व जेसीबी मालक आकर्ष उर्फ आकाश बांते, रा. भिलेवाडा याचे सांगणेवरून अवैधरीत्या साठवणूक केलेल्या रेतीचा साठ्यातील रेती टिप्परमध्ये जेसीबीच्या सहाय्याने भरतांना मिळून आला. त्यांच्या ताब्यातून टिप्पर, जेसीबी व रेती असा एकूण १ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाहीकरीता तलाठी, ग्रा.पं. मांडवी यांचे ताब्यात देण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नूरुल हसन व अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात मडावी, दोनोडे, पुराम, स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली असुन अधीक तपास पोलीस स्टेशन कारधाचे अधिकारी करीत आहे.