प्रदीप पडोळे यांनी प्रशासकीय यंत्रणेस गावात येण्यास भाग पाडले

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :-आंधळगाव ग्राम पंचायत हद्दीत ठळक ११ मुद्द्यांना केंद्र करून चक्क महिला सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरण्याची भूमिका घेतली. त्यातून सादर केलेल्या मागण्या मान्य न झाल्याने उपोषणावर बसलेल्या बबिता मोरेश्वर निनावे यांना आंदोलन स्थळी भेट देऊन भाजपचे विधानसभा अध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी प्रशासकीय यंत्रणा गावात हजर होण्यासाठी भाग पाडले. त्यातून उपस्थित अधिकाऱ्यांनी निनावे यांच्या मागण्या येत्या अठवड्याभरात मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. पडोळे यांनी केलेली मध्यस्ती ग्राम पंचायतकरीता महत्त्वाची ठरल्याने सदस्या निनावे यांनी विशेष आभार व्यक्त करत प्रशासनाला सहकार्य केले.

गावातील अनेक संवेदनशील मुद्द्यांना निनावेंनी उपस्थित केले होते. त्यात गावातील रखडलेले विकास काम, अनेक योजनांचे लाभ यात सर्वात एका पत संस्थेने कर्जधारकांच्या मालमत्तेवर अनधिकृत चढविलेल्या बोझ्याचा विषय महत्त्वाचा ठरला होता. उपोषणस्थळी प्रदीप पडोळे हजर होताच भाजपच्या नेत्यांनी देखील त्यावेळी आपली उपस्थिती दर्शवली. त्यावेळी उल्लास बुराडे, भगवान चांदेवार, संजय सेलोकर, श्याम कांबळे,अश्विन गोंडाणे, सुनील बावणे, सुनील ठवकर, भागवंती शेंद्रे, गणेश सोनकुसरे,संतोष चोपकर, गणेश बाडेबुचे, लक्ष्मी पाठक, संजय गलबले, श्याम दुर्गकर,सुरेश बारापात्रे, नितेश बावणे, सुखराम पाठक, सुधीर बांते त्यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *