
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात “मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्याच्या शासनाच्या सूचनांनुसार भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैदयकीय सहायता कक्षाचे उदघाटन पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींदकुमार साळवे उपस्थित होते. वैद्यकीय उपचासाठी मदतमिळावी याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून सदरचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.