प्रत्येक गावाला कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळेल यासाठी तात्काळ उपाययोजना करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- प्रत्येक गावाला नागरीकांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी आणि जनावरांना पिण्याची पाण्याची मिळण्यासाठी तात्काळ उपाय योजना करा असे निर्देश खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज पाणी टंचाई बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खा. पडोळे यांनी निर्देश दिले. सभेत जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते व इतर अधिकारी उपस्थित होते. खा. पडोळे पुढे म्हणाले, बऱ्याच गावात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे.

जलजिवन मिशन योजनेअंतर्गत बऱ्याच गावात अपुरे कामे राहिलीत, तर कुठे पाण्याची टाकीचे, तर काही ठिकाणी पाईप लाईनचे काम अधूरे असल्याचे समजते. नाग नदीच्या दूषित पाणी आपल्या येते येतअसल्याने कोणत्याच प्रकारची आपण उपाय योजना करू शकले नाहीत ही शोकांतिका आहे. भंडारा जिल्ह्यात बरेच गावात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. हात बोअरवेलला पाणी नाही, विहिरी, नदी, नाले, बंधारे, तलाव कोरडे पडलेले आहेत. पाण्याची पातळी खोल्यात गेली आहे. तलावाचे खोलीकरण केल्या गेले नाही. गाळ किती तयार झाली आहे.

शासकीय विहिरीचे उपसा अजून प्रर्यंत केला गेला नाही. किती ठिकाणी विजेचा पुरवठा आहे, खंडित किती आहे, अतिक्रमण कडे तुमचे लक्ष नाही. जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. शेतकरी तसेच पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांना मोठा प्रश्न पडतो आहे, असेही ते म्हणाले. पाणी पुरवठा अधिकारी नेहमीच उडवाउडवीत उत्तरे देतात याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तीन ते चार महिने त्या गावात पाणी टंचाई असते त्या गावांना नियोजनात न घेतल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

जलजिवन मिशन योजना फसवी असली तरी विशिष्ट लोकांच्या घशात जास्त घुसली, प्रादेशिक योजना बंद आहेत,जलयुक्त शिवार योजनेचे तीन तेरा वाजले दिसते. हर घर नल योजना फसवी निघाली, असेही खा. पडोळे म्हणाले. नवोदय विद्यालयात असलेल्या पाणी टंचाईचा मुद्दाही त्यांनी बैठकीत उपस्थित केला. तेथे ना पिण्याचे पाणी ना वापराचे पाणी मिळत, पाच दिवस तेथील विद्यार्थी आंघोळ करू शकले नाहीत. तेथील बाथरूम आणि शौचालय अस्वच्छतेने पसरले होते. रोगराईचे सावट निर्माण झाले आहे. स्वतः मी रात्री अडीच वाजता जावून शौचालयाची स्वच्छता केली. तेथील प्राचार्य हे विद्यार्थ्यांना दबावात ठेवतात हा प्रकार स्वतः अनुभवला असल्याचेही खासदार म्हणाले. नवीन योजना राबवा, शासनाला तात्काळ पाणी पुरवठा उपाय योजना बाबत प्रस्ताव पाठवा. असेही निर्देश खा. पडोळे यांनी सभेत दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *