
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सन २०२०२१, २०२१-२२ व २०२२२३ या वर्षातील क्रीडापटू व क्रीडामार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात आले. पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते प्रितम हालदार, निता शेंडे कनोईग, जयंत राखडे तलवारबाजी, तन्नु सुनिल डुंभरे तलवारबाजी, निखिल कोहाड तलवारबाजी, कुपा बनसोड तलवारबाजी, क्रीडा मार्गदर्शक संजीव बांडेबुचे, राजेश गेडाम यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रुपये १०,०००/ – रोख पारितोषीक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लतीका लेकुरवाळे, क्रीडा अधिकारी निखीलेश तभाने उपस्थित होते.