
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या नर संहाराच्या विरोधात, सकल हिन्दू समाज भंडारा नगर तर्फे भंडारा बंद व जाहिर विशाल निषेध मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. खा. डॉ. प्रशांत पडोळे, आ. नरेंद्र भोंडेकर व हिंदू बांधव या मोर्चात मोठ्या संख्येने टार्च घेवून उपस्थित होते. मोर्चा जलाराम मंगल कार्यालय, चौक पासून गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, डॉ. गवळी चौकातून नगर परिषद समोर गांधी चौक येथे पोहचला. गांधी चौक येथे पोहचताच मोर्च्याचे रूपांतर श्रद्धांजली सभेत करण्यात आले. आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्यात शाहिद झालेल्या २७ पर्यटकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी “पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा देण्यात आल्या.
(चित्रसेवा – आदित्या ढोमणे, भंडारा)