फादर अग्नल शाळेचे व्यवस्थापक मंडळ बरखास्त करून तात्काळ प्रशासक नियुक्त करा

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- फादर अग्नल शाळेचे व्यवस्थापक मंडळ बरखास्त करून तात्काळ प्रशासक नेमण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह इतरांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. देव्हाडी येथील फादर अग्नय शाळेतील पालक शिक्षक समिती गैरकायदेशीर असल्याची तक्रार पालकांनी केले. तुमसरचे गटशिक्षणाधिकारी यांनी पालक शिक्षक समिती अयोग्य असल्याचा अहवाल दिला. पालकांनी पालक शिक्षक समीती आणि त्यांनी वाढविलेली शुल्क चुकीची असल्याची तक्रार केली. यामुळे ७ विद्यार्थ्यांचा पालकांनी या तक्रारीचे अनुषंगाने आणखी अनेक गैरप्रकाराचे तक्रार केल्याने, काही दिवसांपुर्वी शाळेच्या महिला कर्मचारीचे माध्यमातुन खोटा गुन्हा नोंदविला. तसेच पुर्वसुचना न देता चालु वर्गाच्या मध्यातुन एकुण ७ विद्यार्थी मुलींवर कार्यवाही करुन शाळेतुन काढून टाकण्यात आले.

यापैकी ४ विद्यार्थीला प्रवेश दिला. २ विद्यार्थीनी दुसरीकडे प्रवेश घेतला. फक्त १ मुलीला प्रवेश नाकारला म्हणुन याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र दिनी, १ मे, २०२५ ला पालक आणि अनेक समाजसेवकांनी पंचायत समिती तुमसर समोर जनआंदोलन केले. त्याची दखल घेत मंगला गोतारणे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी भेट घेत दिनांक २ मे २०२५ ला शाळेत जाऊन प्रवेशीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्याअनुषंगाने सुटटीचा कालावधी लोटल्यावर ५ मे, २०२५ ला अर्चना माटेगटशिक्षणाधिकारी तुमसर यांनी दुपारी १२ वाजता पीडित पालक व त्यांच्या मुलीला प्रवेशासाठी फादर अग्नल शाळा देव्हाडीला घेवुन गेल्यानंतर फक्त अर्चना माटे गटशिक्षणाधिकारी तुमसर यांना शाळेमध्ये घेतले आणि शाळेतून बेदखल केलेल्या त्या मुलीला शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अडवुन ठेवत प्रवेश नाकारला. तब्बल ३ तास अडवुन ठेवले यादरम्यान त्या १३ वर्षाच्या मुलीला भर कडक उन्हात तहान लागली असल्यावर शाळेला पाणी मागीतल्यावर शाळेकडुन विद्यार्थीला चक्क पाणी नाकारला, त्यानंतर अर्चना माटे गटशिक्षणाधिकारी तुमसर यांचे मार्फत शाळा व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय तोंडी सांगत त्या विद्यार्थी मुलीचा प्रवेश नाकारला. एकंदरित फादर अग्नल शाळा व्यवस्थापनाने या पध्दतीने नियमाला बाजुला सारूनपालकाचे मुलीला डावलले.

याप्रकरणात शिक्षण विभागाने योग्य प्रकारे दखल घेतली नाही. सदर शाळेची मान्यता शिक्षण विभाग भंडाराने ज्या अटीवर दिली, त्या अटीची अंमलबजावनी शाळेनी केली नाही तरी नियमानुसार शिक्षण विभागाचे त्या शाळेवर कोणतीही कार्यवाही केल्याचे निदर्शनास आलेले नाही. उलट पालकांचे मुलीला पुनः प्रवेश मिळावा म्हणुन तत्कालीन शिक्षणाधिकारी रविंद्र सलामे यांचे शाळेला पत्र दिल्यावर त्याची अंमलबजावनी झाली नाही. शाळा प्रशासनाने तालुका, जिल्हा प्रशासन, विविध संघटनाचे प्रतिनिधींना वकिलाकडुन नोटीस देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत पीडित पालकांचे पाल्यास पुनःप्रवेश देण्यासोबत शाळेचे अन्य गैरप्रकाराचे तक्रारीला गैरकायदेशीर असल्याचे अजुनपर्यंत प्रशासनाने कुठेही उल्लेख केलेला नाही.

संबंधित पालक आणि विविध संघटनेच्या प्रतीनिधींनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करावी. दोषीं प्रशासनावर तात्काळ कार्यवाही करावी. फादर अग्नल शाळेवर प्रशासकाची नेमणुक करुन पीडित पालकाचे मुलीला पुनः प्रवेश देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम, पालक संघाचे अध्यक्ष ॲड. आशिष कुकडे, उपाध्यक्ष डॉ रुद्रसेन भजनकर, सचिव योगेश रंगवानी, सामाजिक कार्यकर्ते अनिल गभने, जवाहर कुंभलकर, तरुण साधवाणी, विजय भाजीपाले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *