कृषी विभागाच्या योजनांपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नका-डॉ. प्रशांत पडोळे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कृषी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नका. शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास खबरदार असा दम खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला. ते कृषी विभागाच्यावतीने आयोजित कार्यशाळेत बोलत होते. उपविभाग स्तरिय खरीप हंगाम पुर्व क्षेत्रीय अधिकारी/ कर्मचारी यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. महसूल विभाग, आणि कृषी विभाग यांचे शेतकऱ्यांचे शेतपिकाचे पंचनामे करतांनी कुठल्याही प्रकारचा ताळमेळ मात्र दिसून येत नाही. बरेच शेतकरी कृषी विभागाच्या योजनेपासून वंचित आहेत. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे पंचनामा करण्यापासून तर मोबदला मिळेपर्यंत वंचित आहेत. आता आलेल्या अवकाळी पावसाने बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतावर आतापर्यंत महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी या कर्मचारी पोहचू शकत नाहीत. ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यांसाठी तरी सरकारच्या दबाव देऊन काम करू नका. असे खडेबोल अधिकाऱ्यांना यावेळी सुनावले. आपल्या कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचत नाही. बऱ्याचदा कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी सहाय्यक, गावातील श्रीमंत शेतकरी यांच्या कडे जाऊन योजनेची माहिती देत असल्याची माहिती गावातील शेतकऱ्यांनी यावेळी दिली. कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांकडे आपल्या विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असतात. त्यांच्या नुकसान झालेल्या शेतपिकाचे पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करीत असतात. हे किती योग्य आहे? शेतकऱ्यांच्या शेतपंचनामे नुकसान भरपाईचे कसे करता, ते सर्वांना माहिती आहे. पंचनामे करित करीत असताना शेतकऱ्यांना का वंचित ठेवले जाते. रब्बी पिक, आणि खरीप हंगामाच्या पिकाची वेळेत शेतकऱ्यांना त्या गावापर्यंत जावून माहिती द्या. गावागावात कार्यशाळा लावा. पुढची बैठक संयुक्त घ्या. महसूल, कृषी, पसुवर्धन या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही कार्यशाळेत बोलवा, असेही यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करणार असल्याचे यावेळी सांगितले. युरिया खताचा तुटवठा पडू देऊ नका. कृषी केंद्रावर लक्ष घाला. शासनाच्या योजनेपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नका.जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *