जिल्ह्याचा निकाल ८७.५८ टक्के, विभागात सहावा
यावर्षी ८७.५८ टक्के निकाल लागला. नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य शाखेच्या आन्या रणजित उजवने हिने ९७.८३ टक्के गुण मिळवून संपूर्णजिल्ह्यात सर्व शाखांमध्ये एकूण प्रथम क्रमांक पटकावला. त्याच महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या मधू नरेश अंगवानी हिने ९७.६७ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक मिळवला तर प्रांजु चंद्रकुमार बलवानी हिने ९४.६७ टक्के गुणांसह तिसरे स्थान मिळवले. विज्ञान, वाणिज्य, कला, वोकेशनल आणि तांत्रिक अशा सर्व शाखांमध्ये नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वर्चस्व राखले. विज्ञान शाखेत मातोश्री क. महा. तुमसर येथील कृष्णा कैलाश इसरानी याने ९२.१७ टक्के मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
गांधी विद्यालय कोंढा येथील अर्थवे अनिल देशमुख यांने ९२ टक्के गुण घेवून द्वितीय तर संत गुलाब बाबा डिफेन्स सर्व्हिसेस ॲकॅडमी चा विद्देश राहीगुडे याने ९१.६७ टक्के गुण मिळवून तृतीय स्थान मिळवले. नूतन कन्या क. महाविद्यालयाची शर्वरी नारायण जुवार हिने ९१.१७ टक्के गुण प्राप्त केले. कला शाखेत देखील नूतनकन्या कनिष्ठ महाविद्यालयाने पहिले ३ क्रमांक पटकावून आपले वर्चस्व राखले. मानसी संजय कोवे हिने ९३.८३ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर साहिली लव झंझाडे हिने ८९.३० टक्के गुणांसह जिल्ह्यात दुसरा आणि लोकेशा मुरलीधर नंदरधने हिने ८९.५० टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.